बीड जिल्ह्यात रोख रकमेचा तुटवडा ; बँकांबरोबरच ग्राहकही हैराण; उपाययोजनांची गरज
बीड जिल्ह्यात नागपूर येथील रिझर्व बँकेच्या कार्यालयाकडून रोख रकम पुरवली जाते. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून त्या ठिकाणाहून रोख रकम मिळण्यात अडचणी येत आहेत. परळीत एसबीआयच्या शाखेतून बँकांना रोखा रक्कम दिली जाते, परंतु त्या ठिकाणीच कॅश उपलब्ध नसल्याने अन्य बँकांना अडचण जाणवत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर सर्व शहरांमध्ये देखील आहे.यामुळे मोठ्या स्वरुपात रोख रकमेची मागणी केल्यास बँक व्यवस्थापनाकडून संबंधीत ग्राहकास ऑनलाईन व्यवहाराविषयी विचारणा केली जात आहे.अथवा एकूण रकमेच्या काही मयदित रोख रकम दिली जात आहे. अनेक बँका तर त्यांच्या इतर ठिकाणच्या शाखांमधून रोख रक्कम मिळवत व्यवहार सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या जाणवत असल्याने मोठ्या स्वरुपातील रोख रकमेचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा