डिवायएफआय चे बेमुदत ठिय्या आंदोलन

 रस्ता दुरुस्तीप्रश्नी रखरखत्या उन्हात युवकांचे आंदोलन



डिवायएफआय चे बेमुदत ठिय्या आंदोलन 

परळी / प्रतिनिधी...

     अंबाजोगाई - मोहा - सिरसाळा व परळी - नागापूर - बोधेगाव - मोहा - सर्फराजपूर या दोन रस्त्यांचे तात्काळ अद्यवतीकरण करा या मागणीसाठी भारताच्या लोकशाहीवादी युवक संघटनेने रखरखत्या उन्हात म्हतारगाव फाटा कान्नापूर या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून वारंवार निवेदने देऊन ही काम होत नसल्याने परिसरातील युवकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे पाऊल उचलले आहे.

परळी तालुक्यातील मोहा गावाला अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही तालुक्याला जोडणा-या राज्य महामार्गाची अतिवृष्टीमुळे चाळणी होऊन या मार्गावरील पूल देखील खचले गेले आहेत. आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी विविध कारणाने या मार्गावरुन हजारो नागरिकांची वर्दळ असताना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागत असून मागील 3 वर्षापासून अनेक वेळा प्रयत्न करून ही आश्वासन शिवाय काहीच पदरी पडत नसल्याने मोहा गाव परिसरातील शेकडो विद्यार्थी, युवकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे दि 20 जानेवारी रोजी ठिय्या करत तीव्र निदर्शने केली. युवकांची आक्रमकता आणि प्रशांचे गांभीर्य पाहता या रस्त्याचे अद्यावतीकरण करण्याचे कार्य आदेश बांधकाम विभागाने पारित केल्याने ही निदर्शने स्थगित करण्यात आली आहेत. आदेश पारित होऊन ही 2-3 महिन्याचा काळ लोटला असून ही रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने भारतीय लोकशाहीवादी युवा संघटना (डीवायएफआय) च्या नेतृत्वाखाली परिसरातील गावातील युवकांनी गुरुवार दि 16 पासून दोन्ही मार्गाला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक म्हतारगाव फाटा कांनापूर ता-धारूर या ठिकाणी रखरखत्या उन्हात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून मागणी लवकरात लवकर न सोडविल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी  संघटनेचे विशाल देशमुख, सुदाम शिंदे, प्रवीण देशमुख, विष्णुपंत देशमुख, सुनील शिंदे, परळी तालुकाध्यक्ष विजय घुगे, सिद्राम सोळंके यांच्यासह उपस्थित युवकांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!