इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश




परळी  (प्रतिनिधी)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दहावीतील ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. परळी तालुक्यातून सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत यशराज बेंबलगे(९८%) या विद्यार्थ्याने प्रथम येऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सदरील परीक्षेत शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळविले आहेत. यामध्ये यशराज बेंबलगे(९८%), रुद्राक्ष गुट्टे(९६%), वैष्णवी जाधव(९६%), तेजस्विनी गुट्टे(९५.६०%), श्रेयश बळवंत(९५.२०%),तन्मय बेंबलगे(९३.८०%), अमरनाथ कराड(९३.६०%), प्रथमेश लहाने(९२.८०%), अनुष्का नागरगोजे(९२.४०%), कपिल सावंत (९२.२०%), सार्थक केंद्रे (९१.८०%), वैष्णवी मुंडे(९१.४०%), अभिलाषा दहिवाळ (९१.२०%), नंदिनी चाटे (९०.६०%), आकांक्षा गुट्टे (९०.२०%)यांचा समावेश आहे. तसेच ८०% ते ९०% यादरम्यान२७ व ७०%  ते ८०% यादरम्यान २५ विद्यार्थी आहेत.

शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध विषयामध्ये  100 पैकी 100 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले आहे. यामध्ये संस्कृत विषयांमध्ये यशराज बेंबलगे, प्रथमेश लहाने, श्रेयश बळवंत व मराठी आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये वैष्णवी जाधव यांचा समावेश आहे. तसेच गणित या विषयांमध्ये यशराज बेंबलगे(९५),प्रथमेश लहाने(९०), श्रेयश बळवंत(८९), इंग्रजीमध्ये  यशराज बेंबलगे(९८),आकांक्षा गुट्टे (९८), वैष्णवी जाधव (९८), विज्ञानमध्ये यशराज बेंबलगे(९५), तेजस्विनी गुट्टे (९२), रुद्राक्ष गुट्टे(९२), मराठीमध्ये वैष्णवी जाधव (१००),अन्वी मुंडे (९९),रुद्राक्ष गुट्टे(९८), संस्कृतमध्ये यशराज बेंबलगे(१००), प्रथमेश लहाने(१००), श्रेयश बळवंत(१००), हिंदीमध्ये प्रणव मोडीवाले(९२), पार्थ बडे(९१), राधिका मुरकुटे(९१), प्रथमेश काळे(९१), सामाजिक शास्त्रामध्ये वैष्णवी जाधव(१००), यशराज बेंबलगे(९९), राधिका मुरकुटे(९७) तर आय.टी.मध्ये यशराज बेंबलगे(९८), रुद्राक्ष गुट्टे (९८), श्रेयस बळवंत(९८), वैष्णवी मुंडे(९८), नंदिनी चाटे(९८), श्रेयश मुंडे(९८) गुण मिळविले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केल्यामुळे विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब IAS (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदनही केले. तसेच इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या