सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

 नीट-युजी 2026 परीक्षा: एनटीएने जारी केला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक, चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार थेट अपडेट्स

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट-युजी पुनर्रचना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी आपला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक **+91 7827980287** जाहीर केला आहे. सोशल मीडियावर नीट परीक्षेबाबत पसरणारे बनावट मेसेज, पेपर लीकच्या खोट्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी एनटीएने हे पाऊल उचलले असून याद्वारे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू करण्यात आले आहे.

हे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल केवळ एकतर्फी ब्रॉडकास्ट सेवा (Broadcast Service) म्हणून काम करेल, म्हणजेच विद्यार्थ्यांना यावर परीक्षेचे वेळापत्रक, नवीन प्रवेशपत्र (Admit Card) आणि आवश्यक सूचनांचे थेट संदेश प्राप्त होतील, परंतु त्यांना यावर रिप्लाय किंवा संदेश पाठवता येणार नाही. एनटीएने स्पष्ट केले आहे की, अधिकृत अकाऊंटवर 'ब्लू व्हेरिफाइड टिक' आणि 'National Testing Agency' हे नाव असणे अनिवार्य आहे. एजन्सी कधीही व्हॉट्सॲपवर ओटीपी, वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील मागत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये आणि केवळ याच अधिकृत क्रमांकावरील माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#NEETUG2026 #NTAWhatsApp #ExamUpdates #CyberSafetyStudents #NEETReExam

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या