इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

 परळीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची भक्तिमय वातावरणात मंगलमय सांगता !

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वानिमित्त दगडगुंडे– पाटील– सेवलीकर परिवाराच्या वतीने गणेशपार येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मनोहरपंत बडवे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची भक्तिमय वातावरणात मंगलमय सांगता झाली. या सोहळ्याने भाविकांना भक्ती, ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचा अमूल्य ठेवा प्रदान केला.समाजात प्रेम, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी भागवतकथा  दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळूमहाराज उखळीकर यांनी केले.

   पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ज्ञानयज्ञाची आज (दि.१४ ) रोजी अतिशय मंगलमय वातावरणात सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर्वणी ठरली. या कथा सोहळ्यात प्रसिद्ध भागवतमर्मज्ञ, ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर आपल्या ओजस्वी आणि मधुर वाणीमधून ही कथा झाली.  या कथेदरम्यान विविध प्रसंगाच्या अनुषंगाने सादर होणारी श्रवणीय भजने व अभंगांची प्रमाणे यामुळे वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले. या सप्ताहात भाविकांना भागवतकथेतील सैद्धांतिक मर्म व भजनानंदाची अद्भुत अनुभुती प्राप्त झाली.  श्रीमद् भागवत महापुराणातील सर्व सिद्धांत व  यामागचे धार्मिक,सांस्कृतिक, सामाजिक, तत्त्वज्ञान आणि  या प्रसंगांतून मानवाने शाश्वत समृद्धीचा संदेश याबाबतचे नाविन्यपूर्ण विश्लेषण या कथा प्रसंगात ऐकायला मिळाले. 

       या कथा ज्ञानयज्ञात सुप्रसिद्ध भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळूमहाराज उखळीकर यांनी आपल्या ओजस्वी, रसाळ आणि प्रभावी वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण केले. त्यांच्या प्रवचनातून भक्ती, वैराग्य, सदाचार, कुटुंबमूल्ये, समाज प्रबोधन आणि मानवतेचा संदेश भाविकांच्या हृदयापर्यंत पोहोचला. आजच्या सांगता सोहळ्याप्रसंगी  बोलताना ह.भ.प. बाळूमहाराज उखळीकर  यांनी सांगितले की, श्रीमद् भागवत हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून मानवाला आदर्श जीवन जगण्याची दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे. भागवत श्रवणातून मन शुद्ध होते, संस्कार दृढ होतात आणि ईश्वरभक्तीचा मार्ग सुकर होतो. समाजात प्रेम, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी भागवत कथेचे चिंतन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.कथा समाप्ती प्रसंगी कथा यजमान सौ. स्वराली स्वानंद पाटील व स्वानंद पाटील  तसेच परळी वैजनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी  या दाम्पत्यांच्या हस्ते हस्ते श्रीमद् भागवत महापुराणाची विधिवत महापूजा व  आरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व  भाविक उपस्थित होते.  भक्तीमय वातावरण व हरिनामाचा नामघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

     अधिक मासाच्या या पुण्यकालात आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने भाविकांनी कथा श्रवणाला मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शविली. सात दिवस हरिनाम संकीर्तन, भागवत श्रवण आणि भक्तीमय कार्यक्रमांमुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी यावेळी दगडगुंडे– पाटील–सेवलीकर परिवाराच्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात संस्कार, एकात्मता आणि अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन होत असल्याचे सांगितले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दगडगुंडे– पाटील–सेवलीकर परिवाराने अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या