सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

 नीट पुनर्परीक्षार्थींना एसटीचा मोफत प्रवास द्या; ॲड. जीवन देशमुख यांची मागणी

परळी | प्रतिनिधी

21 जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे की, नीट परीक्षा यापूर्वी पार पडली होती. मात्र, पेपरफुटीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची कोणतीही चूक नसताना पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावासह आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.

21 जून रोजी होणाऱ्या या पुनर्परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून दूर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जावे लागणार आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून बहुतांश पालक शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. अशा परिस्थितीत प्रवासाचा अतिरिक्त खर्च करणे अनेक कुटुंबांसाठी जिकिरीचे ठरत आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंजाब राज्यात आम आदमी पक्षाच्या सरकारने नीट परीक्षार्थींना हॉलतिकीट दाखवून 20, 21 आणि 22 जून या कालावधीत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही नीट परीक्षार्थी आणि त्यांच्या एका पालकाला एसटी बसमधून मोफत प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी ॲड. जीवन देशमुख यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्र्यांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या