इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

आ.रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनात महादेव गंगणे पाटील यांनी नोंदवला सहभाग



परळी | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी भेट देत सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

आंदोलनादरम्यान शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविणे, ओटीएस योजनेतील अटी शिथिल करणे, वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे, पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करणे तसेच पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासंदर्भातील मागण्या उपस्थित करण्यात आल्या. शेतकरी अडचणीत असताना शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या