पैसे न दिल्याने पोटच्या मुलाकडून ६५ वर्षीय वृद्धाला काठीने अमानुष मारहाण


आष्टी: तालुक्यातील शिरापूर येथे पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, अंभोरा पोलीस ठाण्यात नराधम मुलाबाहेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरापूर येथील रहिवासी शिवाजी गंगाराम देवकर यांनी मुलगा युवराज शिवाजी देवकर याला पैसे देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग मनात धरून आरोपी युवराजने १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळ वडिलांना गाठले. त्याने हातातील काठीने वृद्ध वडिलांच्या मांडीवर, पाठीत, हातापायावर बेदम मारहाण करत मुका मार दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने डाव्या बाजूच्या डोक्यात काठी मारून वडिलांना गंभीर जखमी केले. मारहाण करतानाच आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित वृद्ध वडिलांनी अंभोरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी युवराज देवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार गर्जे या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!