सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...

कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी वेधले लक्ष

कलामयी आर्ट क्लासेसच्या तिसऱ्या कला प्रदर्शनाचे नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन



कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी वेधले लक्ष

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

       परळी शहरातील कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या मैथिली लोंढे यांच्या कलामयी आर्ट क्लासेस आयोजित तिसऱ्या भव्य कला प्रदर्शनास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कला प्रदर्शनाचे उद्घाटन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भाजप नेत्या डॉ. शालिनी कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

     काळाराम मंदिर, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे 20 व 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ‘रंग, कल्पना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात चित्रकला, रेखाटन, क्रिएटिव्ह आर्ट, विविध पेंटिंग्ज, व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट), रंगोळी तसेच इतर अनेक कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या कलाकृती पाहण्यासाठी कला रसिक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

     यासोबतच कलामयी आर्ट क्लासेसच्या वतीने रविवारी (दि. 21 जून) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 5 वी ते 7 वी आणि 8 वी ते 10 वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून अंतराळ संशोधन, एक झाड-चार ऋतू, पाण्याखालील दृश्य, प्रेरणादायी व्यक्तीचे व्यक्तिचित्र, माझ्या आवडत्या खेळाचे दृश्य तसेच गाव व ग्रामीण जीवन अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातून तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन  कलामयी आर्ट क्लासेस संचालिका मैथिली लोंढे यांनी  केले आहे. कलेची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या