मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे...

ना. पंकजा मुंडेंनी भाजपा कार्यकर्त्यांसमवेत ऐकली पंतप्रधान मोदींची 'मन की बात'


मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे

मुंबई दि. २८ --

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम आज माझगाव येथे भाजपा कार्यकर्त्यां समवेत बसून ऐकला. मोदींजीचे राष्ट्रहिताचे विचार उर्जादायी असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो, पंतप्रधान या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर जनतेशी संवाद साधत असतात. आज मुंबई भाजयुमो आयोजित 'मन की बात - जी नेक्स्ट सोबत' या कार्यक्रमात सहभागी होऊन ना. पंकजाताईंनी नरेंद्रजी मोदी यांचे विचार ऐकले. माझगाव येथील मॅकडोनाल्ड्समध्ये आजच्या तरुण पिढीसोबत राष्ट्रहिताचे हे विचार ऐकणे अतिशय ऊर्जादायी ठरले असल्याचे त्या म्हणाल्या.

  ​याप्रसंगी दक्षिण मुंबई  भाजप जिल्हाध्यक्ष शलाका साळवी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष दिपक सिंह, महामंत्री नितीन बनकर, आणि आयोजक भाजयुमोचे मुंबई महामंत्री कमलेश डोके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या