मोठी बातमी.....मोठी घडामोड
परळीत शिवसैनिकांचा जल्लोष; उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जंगी स्वागत!
छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; घोषणांनी परिसर दणाणला
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज धाराशिव येथे आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांच्या विराट मेळाव्यासाठी जात असताना परळी वैजनाथ येथे शिवसेना परळी शहर व तालुक्याच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक भगव्या झेंड्यांनी, ढोल-ताशांच्या गजराने आणि शिवसैनिकांच्या उत्साहाने अक्षरशः दुमदुमून गेला.
यावेळी श्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर उत्सवमय झाला. शिवसेनाच्या उप नेत्या सुषमा ताई अंधारे तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल व शहरप्रमुख राजेश विभुते यांनी उद्धव ठाकरे यांना रुद्राक्षाची माळ, भगवी शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.
यावेळी शिवसेना बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव शिवसेना बिड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे उप जिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते उप तालुका प्रमुख महेश केंद्रे जगन्नाथ साळुंखे प्रकाश साळुंखे हनुमान भारती शंकर डंके विजय राठोड भारत ईगले उपस्थित हजारो शिवसैनिकांनी "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", "उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं", "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "जय भवानी, जय शिवाजी" अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या वातावरणात झालेल्या स्वागताने परळी शहर भगवेमय झाले होते. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत धाराशिवकडे प्रस्थान केले.
या स्वागत सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच परळी शहर व तालुक्यातील हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा