GVT व वृक्षसंवर्धन चळवळीचा मोठा संकल्प; २५ लाख वृक्षलागवडीसाठी २१ जूनला मयंक गांधी यांच्या उपस्थितीत परळीत बैठक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी एक मोठी पर्यावरणीय लोकचळवळ उभी राहत आहे. 'ग्लोबल विकास ट्रस्ट' (GVT) ने तालुक्यात तब्बल २५ लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडला आहे त्यानुषंगाने आपल्या शहरात सुद्धा GVT व 'वृक्षसंवर्धन चळवळ, परळी वैजनाथ' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या भव्य मोहिमेची रूपरेषा आखण्यासाठी येत्या रविवारी २१ जून रोजी योग दिवसाचे औचित्य साधून एका विशेष अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
*ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी करणार मार्गदर्शन*
या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जल-पर्यावरण चळवळीचे प्रणेते मा. मयंकजी गांधी यांची लाभलेली प्रमुख उपस्थिती. बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आणि पर्यावरण प्रेमींना मयंक गांधी यांच्याशी थेट संवाद साधून पर्यावरण संवर्धनाचे धडे घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्यरविवार, २१ जून रोजी असणाऱ्या 'जागतिक योग दिनाचे' औचित्य साधून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात योग दिनाचे स्वागत करत, या लोकचळवळीची पुढील दिशा आणि रूपरेषा निश्चित केली जाईल.
बैठकीचा तपशील पुढीलप्रमाणे;
दिवस आणि दिनांक : रविवार, २१ जून २०२६
वेळ : सकाळी ठीक ७:०० वाजता
स्थळ : राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, परळी वैजनाथ
निसर्गाचा श्वास जपण्यासाठी आणि परळी परिसराचा कायापालट करण्यासाठी शहरातील सर्व सजग पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी आपल्या मित्र परिवारासह या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन GVT परिवार व वृक्षसंवर्धन चळवळीच्यावतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा