परळीकरांच्या वतीने आत्मीय स्वागत!!!!

 राजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी परळीत घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी वैजनाथ | प्रतिनिधी...

       सातारा संस्थानच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शनिवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली.

      खा.उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या मराठवाडा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानिमित्त त्यांनी परळी वैजनाथ येथे येऊन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत श्रद्धाभावाने पूजा केली. यावेळी परळीकरांच्या वतीने त्यांचे आत्मीय स्वागत करण्यात आले. परळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी तमाम परळीकरांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. तसेच वैद्यनाथ देवस्थान समितीच्या वतीने सचिव राजेश देशमुख यांनी प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा व मानाचे उपरणे देऊन त्यांचा सत्कार केला. 

      यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले,नगरसेविका अंजली माळी, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, रमेश चोंडे, गणेश कराड, नितीन समशेट्टे, अश्विन मोगरकर, विकास हालगे,विजयकुमार खोसे, सुशील हरंगुळे, सेवाकराम जाधव,नितीन शिंदे, शंकर कापसे,  सुरेश नानवटे, शिवाजी देशमुख, शिरीष स्वामी, गणेश स्वामी,योगेश फुलारी, योगेश स्वामी आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने  उपस्थित होते. मान्यवरांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दर्शनानंतर त्यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी राज्याच्या आणि जनतेच्या सुख- समृद्धीसाठी प्रार्थना केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...