दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !

इमेज
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केज :- प्रतिनिधी... पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.  केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत ...

ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी.

 ट्रेझरीच्या लेखापालचे घर फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास






केज:- वडील आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ट्रेझरीत कनिष्ठ लेखापाल असलेल्या कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला आहे.

केज तालुक्यातील तांबवा येथील महादेव नारायण परळकर हे अंबाजोगाई येथील ट्रेझरी कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत आहेत. त्यांचे वडील नारायण परळकर यांना पॅरालिसीस झाल्याने त्यांना दि. २७ जून रोजी उपचारासाठी विवेकानंद हॉस्पीटल लातुर येथे ॲडमिट केले असल्याने त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हे तांबवा येथील त्यांच्या राहत्या घराला कुलुप लावुन लातुर येथे गेले होते.

दि. १ जुलै रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारी रहात असलेल्या त्रिशाला भिमराव ओव्हाळ या महिलेने त्यांना फोन करुन सांगीतले की, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे. माहिती मिळताच महादेव परळकर हे गावी आले. त्यावेळी त्यांनी पाहीले असता घराचे दरवाजा उघडा दिसला व घराचे दरवाज्याला लावलेले कुलुप खिडकीत बाजुला ठेवलेले दिसले. त्यांनी घरात जावुन पाहीले असता कपाट व पेट्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने कपाटात ठेवलेले पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे सेव्हन पीस, पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि रोख पन्नास हजार रु. असा एकूण १ लाख ७५ हजार ७०० रु. चा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

हनुमंत परळकर यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४१५/२०२६ भा. न्या. सं. ३०५(ए), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.

ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी 

पोलिसांनी घरफोडीचा तपास करण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून चोरीचा तपास करण्यासाठी त्यांची मदत घेतली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट