केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यशासनाचे मुंडेंनी मानले आभार

परळी धर्मापुरी रस्त्यावर सिमेंट फॅक्टरी रेल्वे फाटकावर होणार 57 कोटींचा उड्डाणपूल, धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाळला



उड्डाण पुलामुळे वाहतूक होणार सुरळीत, धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई (प्रतिनिधी) - धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मधील परळी ते धर्मापुरी रस्त्यावरील सिमेंट फॅक्टरी परिसरातील रेल्वे फाटक LC-T24 येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या 56.28 कोटी रुपयांच्या कामास केंद्र सरकारने प्रशासकीय मान्यता दिली असून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे याबाबत यशस्वी पाठपुरावा केला आहे.

सिमेंट फॅक्टरी परिसरातील रेल्वे फाटक स्थळी रेल्वे आल्यानंतर अगदी तासनतास वाहतूक ठप्प असायची, तसेच अनेक लहानमोठे अपघात घडत असत. मात्र आता हा प्रकल्प उभारल्याने संपूर्ण वाहतूक सुरळीत होणार आहे. 

धनंजय मुंडे यांनी याबाबत नितीन गडकरी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती. दरम्यान हा प्रकल्प मंजूर केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंदर राजे भोसले, मंत्री पंकजाताई मुंडे यांसह केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!