गणेशपार भागात 20 तासांपासून बत्ती गुल

 गणेशपार भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवा अन्यथा आंदोलन करु-अश्विन मोगरकर

गणेशपार भागात 20 तासांपासून बत्ती गुल

परळी (प्रतिनिधी)

गणेशपार येथील विद्युत रोहित्र खराब झाल्याने मागील १८ तासांपासून संपुर्ण गणेशपार भागात अंधार असून महावितरण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने महावितरण विरोधाच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

गावभागातील महत्वाचा भाग असलेल्या गणेशपार येथील विद्युत रोहित्र शनिवार, ८ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता बंद पडले. विद्युत रोहित्रातून अचानक ऑइल गळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने लाईट बंद करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून या विद्युत रोहित्र व फ्यूज बॉक्सची दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप अश्विन मोगरकर यांनी केला आहे. सततचा विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत रोहित्राजवळ जाळ होणे, तारेवरती आलेले झाडे तोडणे अश्या अनेक समस्या बाबत वारंवार दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. सततच्या या दुर्लक्षामुळे गावभागातील नागरिकांत परळी महावितरणच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. सततच्या या समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरण च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

परळी शहर महावितरण चा कारभार तालुक्यातील धर्मापुरी येथील उप अभियंत्याकडे दिला आहे. परळी सारख्या मोठ्या शहराचा कारभार बघण्यासाठी कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी कायम स्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार