श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीचे दर्शन...
शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ यांचा परळी येथे सत्कार
श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीचे दर्शन घेत बीड जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी साकडे
परळी वैजनाथ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ यांनी परळी वैजनाथ येथे भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा ताई अंधारे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे, बीड जिल्हा महिला संघटक मीरा ताई नवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारानंतर अशोक सपकाळ यांनी परळी वैजनाथ येथील श्री प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच योगेश्वरी देवीचेही दर्शन घेण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा आणि जिल्ह्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीला साकडे घालण्यात आले.
या भेटीमुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा