केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मंजुरी आणि १०४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध

परळी मतदारसंघातील लोखंडी सावरगाव ते बर्दापूर फाटा रस्ता आता होणार चौपदरी, धनंजय मुंडेंच्या मागणीला यश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मंजुरी आणि १०४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध

अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत धनंजय मुंडेंनी दिल्लीत नितीन गडकरी यांच्याकडे केली होती मागणी

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील बीड व लातूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ - ब मधील लोखंडी सावरगाव ते लातूर रोडवरील बर्दापूर फाटा या दोन पदरी रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार असून, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कामास धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार मंजुरी दिली असून सुमारे १७.५० किमी लांबीच्या चौपदरीकरण कामासाठी १०४.४९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, तसेच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याने लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 

वाढती भरधाव वाहतूक आणि रस्त्यालगतची गावे यामुळे बीड व लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्हा हद्द ते लातूर जिल्हा हद्द हा रस्ता दोन पदरी असल्याने नेहमी अपघात घडत होते. याचाच विचार करून धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा हद्दीतील या रस्त्याचे लातूर जिल्हा हद्दीप्रमाणेच चौपदरीकरण करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली होती. त्यानुसार या कामाला आता निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच बीड जिल्हा हद्दीतील लातूर रोड (लोखंडी सावरगाव ते बर्दापूर फाटा) आता चौपदरी होणार आहे. याबद्दल श्री मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

धनंजय मुंडेंनी हे रस्ते केले चकाचक

या रस्त्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील परळी ते बर्दापूर, परळी ते धर्मापुरी, परळी ते सिरसाळा, परळी ते सोनपेठ, अंबाजोगाई ते मांडेखेल - नाथरा मार्गे सोनपेठ, असे विविध रस्ते चकाचक केले आहेत. तर परळी शहर बायपास व परळी ते गंगाखेड रस्त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे परळीकडे येणारे सर्वच रस्ते आता चकाचक झाले आहेत!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!