लाभ घेण्याचे आवाहन..
श्री गणेश मंडळातर्फे आज रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन
परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत रक्तगट तपासणी (आरोग्य तपासणी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत श्री गणेश मंडळाने या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांना आपल्या रक्तगटाची माहिती असणे अत्यंत आवश्यक असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास ही माहिती उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
हनुमान मंदिर, सुभाष चौक, परळी वैजनाथ येथे हे शिबिर होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा