परळीतील संशोधक युवकाच्या ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेतील उपकरण डिझाईनला केंद्राची मान्यता !

प्रा.डॉ.गिरीश चाटे यांच्या मृदा प्रतिमा ओळख व पीक शिफारस उपकरण डिझाइनला भारत सरकारचे पेटंट

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

    शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.  ‘डीप लर्निंग-बेस्ड सॉईल इमेज रिकग्निशन अँड क्रॉप रिकमेंडेशन डिव्हाइस’ या उपकरणाच्या डिझाइनची भारत सरकारच्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीचे प्रमाणपत्र गिरीश दशरथ चाटे  यांच्या नावावर जारी करण्यात आले आहे. यामुळे परळीतील युवकाच्या ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेला केंद्राची मान्यता मिळाली आहे.गिरीश दशरथ चाटे यांच्या मृदा प्रतिमा ओळख व पीक शिफारस उपकरण डिझाइनला भारत सरकारचे पेटंट मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

        भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या पेटंट कार्यालयाने गिरीश चाटे यांच्या या डिझाइनला नुकतेच पेटंट प्रमाणपत्र जारी केले आहे. या उपकरणाच्या नावावरून मातीच्या प्रतिमांचे डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विश्लेषण करणे आणि पीक निवडीसाठी शिफारस करणे, अशी त्याची संकल्पना असल्याचे स्पष्ट होते.शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना अशा प्रकारच्या उपकरणांच्या विकासाला महत्त्व प्राप्त होत आहे. शेती क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असताना या उपकरणाच्या डिझाइनची नोंदणी ही संशोधन आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब मानली जात आहे. मातीच्या प्रतिमांची ओळख आणि पीक शिफारशीशी संबंधित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक माहितीपूर्ण व तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या प्रयत्नांना यामुळे नवी दिशा मिळू शकते.

      परळी वैजनाथ तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ.गिरीश दशरथ चाटे यांनी संशोधनात्मक हे उपकरण डिझाईन निर्माण केले असून त्याला स्मार्ट शेती संकल्पनेतील संशोधनात्मक कार्यात केंद्राने मान्यता दिली आहे. याबाबतचे अधिकृत पेटंट प्रमाणपत्र त्यांना जारी करण्यात आले आहे. या संशोधन कार्यात त्यांना प्रा. डॉ. संदीप शशिकांत भामरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधनाच्या क्षेत्रात या यशस्वी कार्याबद्दल गिरीश चाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे काही दिवसांपूर्वीच गिरीश चाटे  यांना विद्याक्षेत्रातील मानाची समजली जाणारी पीएचडी पदवीही प्रदान करण्यात आलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!