दुर्दैवी घटना....
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय युवकाचा परळी वैजनाथ तालुक्यातील कौठळी येथे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
परळी वैजनाथ तालुक्यातील कौठळी येथील नदीपात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आदिनाथ भाऊराव जाधव (वय 20 वर्षे) रा.कौठळी तांडा असे मयत युवकाचे नाव आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी दिली आहे.

आपल्या परदेशी परंपराच आहे दरवर्षी कोणी ना कोणी जातच पाण्यात बुडून
उत्तर द्याहटवा