सत्याचे रिंग माणुसकीच्या जाणिवेचे उपक्रम संपन्न
प्रा.प्रसाद देशमुख यांना " उत्कृष्ट युवा सेवा सन्मान" पुरस्कार
ज्ञानी त्यास म्हणावे ज्यास माणुसकिची जाण - प्रा. प्रसाद देशमुख
परळी - वै : राष्ट्रीय सेवा योजना विभाग वैद्यनाथ कॉलेज परळी वतीने एन. एस. एस. स्थापना दिना निमित्ताने उत्कृष्ट युवा सेवा सन्मान पुरस्कार वितरण व सत्याचे रिंग माणुसकीच्या जाणिवेचे हे या उपक्रमाचे आयोजन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश राठोड तर प्रमुख व्यक्ते तसेच गौरवमुर्ती प्रा. प्रसाद देशमुख, आयोजक प्रा. माधव रोडे करण्यात आले. उपस्थिति मान्यवरांनी महात्मा गांधी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण अभिवादन करून सुरूवात केली. एन. एस. एस. मधे मागील २० वर्षेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एन. एस. एस. स्वयंसेवक प्रा. प्रसाद देशमुख यांना उत्कृष्ट युवा सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरव सन्मान प्राचार्य डॉ. रमेश राठोड, प्रा. डॉ. माधव रोडे ,उपप्राचार्य हरिश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य हरिश मुंडे , प्रा. उत्तम कांदे , प्रा. राजु गोरे , प्रा. प्रमोद गीत्ते , प्रा. मेघा धांडे मॅडम, प्रा. सोमनाथ किरवले , प्रा. दिलीप गायकवाड उपस्थितित होते. यावेळी ४० मुली व ८० मुलांनी उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन कराताना उत्कृष्ट युवा सेवा सन्मान पुरस्कार गौरवमुर्ती प्रा. प्रसाद देशमुख म्हणाले एन. एस. एस. मधून मी खूप शिकलो. त्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना मी कर्मच श्रेष्ठ मानल. कर्मच धर्म आणि कर्मच आमची जात हे संस्कार आम्हाला कर्मयोगी प्रा. माधव रोडे यांनीच दिले. युवक मित्रानो ज्ञान असणे आणि माहिती संपादन करणे यात मोठा फरक आहे. आपण फक्त माहिती गोळा करत आहोत. ज्ञान घेत नाहीत . ज्ञान प्राप्ती होणे म्हणजे माणुसकिची जाणिव होऊन लोकहितावह विधायक कर्म करणे होय अस माझा ठाम मत आहे. आज ए. आय . च्या युगात ए. आय . चा वापर विधायक गोष्टीसाठी करा. पदवी पेक्षा कौशल्य महत्वाचे आहे. मला रा. से. यो. वैद्यनाथ कॉलेज विषयी तेवढाच जिवाळा कायम आहे. मी एन. एस. एस. च्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेताला याचा मला आज अभिमान वाटतो. यावेळी अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. रमेश राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. माधव रोडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमधिकारी डॉ. प्रमोद गीत्ते, तर गौरव सन्मान पत्र प्रा. दिलिप गायकवाड यांनी वाचले. तर सुत्रसंचलन रितेश कसबे , आभार आस्था रोडे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा