पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंबाजोगाई रोडवरील उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

इमेज
आरोग्यासाठी चालणारे हात स्वच्छतेसाठी सरसावले; परळीतील टेकडीवर डॉक्टरांची स्वच्छता मोहीम अंबाजोगाई रोडवरील उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; बाटल्या अन् प्लास्टिकचा कचरा गोळा करून लावली विल्हेवाट परळी वैजनाथ, दि. २७ सप्टेंबर : परळी परिसरात दररोज सकाळी आरोग्यासाठी टेकडीवर फिरायला जाणाऱ्या चौघांनी रविवारी परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अंबाजोगाई रोडवरील टेकडी परिसरात पडलेल्या बाटल्या, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे संकलन करून डॉ. गोपाळ झंवर, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. विश्वास भायेकर आणि केंद्रे यांनी स्वच्छता मोहीम राबवली. गोळा केलेला कचरा गोण्यांमध्ये भरून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात आला. परळी शहरातील अंबाजोगाई रोडलगतच्या डोंगर परिसरात हजारो नागरिक सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी आणि व्यायामासाठी येतात. नियमित फिरायला येणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन उंच टेकडीवर ‘आरोग्यदायी हनुमान मंदिरा’ची स्थापना केली आहे. दर्शनासोबतच टेकडी चढण्याचा व्यायाम व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. परिसरात चांगली पायवाट, दिशादर्शक फलक, बसण्यासाठी बाके आणि वृक्षारोपण असे उपक्रमही नागरिकांच्या सहभागातून राबवले जातात. म...