बंजारा समाज एकता यात्रा रविवारी परळीत संत सेवालाल महाराज चौकात होणार स्वागत-अमर पवार परळी(प्रतिनिधी) धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केलेली बंजारा समाज एकता संकल्प यात्रा रविवार दि.१२ जुलै रोजी परळीत येत असुन संत सेवालाल महाराज चौकात या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार असुन या यात्रेच्या स्वागतास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बंजारा समाजाचे सेवागड विश्वस्त परळी वैजनाथ अमर पवार यांनी केले आहे. बंजारा समाज एकता यात्रा बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोवाडा गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केली असुन ही यात्रा ही ५ जुलै सेवागढ आंध्र प्रदेश येथून निघणार आहे १८ राज्यातुन बंजारा एकतेचा संदेश देत दि.२६ जुलै रोजी दिल्ली येथे पोंहोचणार आहे.यात्रेदरम्यान भगवंतसेवक किशन राठोड यात्रेनिमित्त देशातील बंजारा समाजांना पांढर्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संकल्प करणार आहेत.यात्रेचे नियोजन प्रवीण ...