स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत !..
नियोजन समितीच्या बैठकीत ना. पंकजाताई मुंडेंची जिल्ह्यासाठीची तळमळ सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत ! मतदारसंघात विकासाच्या त्रिसूत्री वर भर देण्याचे केले आवाहन बीड दि. ३१ --- राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रावहिनी पवार या जबाबदारीने काम करत असून, दिवंगत अजितदादा यांच्या कार्याचा वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. दादांच्या कामाची शैली आणि कामांचा धडाका त्यांच्यात दिसतो आहे अशा शब्दांत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असं सांगत जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. सुरुवातीला सुनेत्राताई पवार यांचे ना. पंकजाताईंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत ...