गुरुपौर्णिमेनिमित्त अभिनेत्री रूपाली भोसलेने घेतलं श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; पारंपरिक लूकची चाहत्यांत चर्चा

परळी वैजनाथ : मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले हिने गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पारंपरिक साडी आणि मराठमोळ्या पेहरावात मंदिरात दाखल झालेल्या रूपालीच्या सोज्वळ लूकने भाविकांसह चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

              रूपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा असून तिने 'मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'महासंग्राम', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'कुलस्वामिनी', 'कुलवधू', 'माहेरची साडी', 'वहिनीसाहेब', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'तुझे माझे जमेना', 'आयुष्मान भव' आणि 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे.

तिने 'बिग बॉस मराठी २' मध्येही सहभाग घेतला होता. तसेच हिंदीतील 'कसम से', 'बड़ी दूर से आये हैं' आणि 'तेनाली रामा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत तिने हिंदी प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत.

         गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान वैद्यनाथांचे दर्शन घेत रूपालीने सुख, समृद्धी आणि सर्वांच्या मंगलमय आयुष्यासाठी प्रार्थना केली. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या आगमनाने मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्सुकता व आकर्षण निर्माण झाले. श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारा तिचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.




#RupaliBhosale #रूपालीभोसले #GuruPurnima #गुरुपौर्णिमा #ShriVaijnath #VaijnathJyotirlinga #ParliVaijnath #परळीवैजनाथ #Mahadev #HarHarMahadev #Jyotirlinga #TempleVisit #MarathiActress #MarathiEntertainment #Devotional #SpiritualJourney #Trending #MarathiNews #MBNews #Maharashtra

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...