स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: केजमध्ये घरफोडी करणारा आरोपी ४८ तासांच्या आत गजाआड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
केज: प्रतिनिधी...
केज पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या रात्र घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), बीडच्या पथकाला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
केज पोलीस ठाण्यात गु.र.नं ४८१/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(a) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पथक करत होते. २९ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक केज परिसरात आरोपीचा शोध घेत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. सदर घरफोडी फुलेनगर येथील ऋषिकेश काळे याने केल्याचे निष्पन्न झाले.
माहितीच्या आधारे पोलिसांनी फुलेनगर भागातील त्याच्या राहत्या घरातून ऋषिकेशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन पंचांसमक्ष त्याच्या घरातून चोरलेली २,८१,००० रुपयांची रोख रक्कम आणि ७४,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ३,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजीगाई) श्रीमती चेतना तिडके, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बाप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक गणेश मराडे यांच्या पथकाने केली.
------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा