पोस्ट्स

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ : परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख यांचे 87 वर्षी  आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. निधनाने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने देशमुख परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.
इमेज
संतभूमी रक्षणासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भामचंद्र डोंगरावर पुणे : प्रतिनिधी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्काराची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मातोश्रीच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २६) भामचंद्र डोंगराची प्रत्यक्ष पाहणी केली. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर हे डोंगर संत तुकाराम महाराजांच्या ध्यान, चिंतन व साधनेशी जोडलेले असून, या परिसराला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. या डोंगर परिसरात बौद्ध, शैव व जैन परंपरेशी संबंधित प्राचीन लेणी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रकल्प, अतिक्रमण आणि कथित बेकायदेशीर उत्खननामुळे या परिसराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने केला आहे. या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने सन २०११ मध्ये भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर डोंगर परिसराचा राज्य संरक्षित स्मारकाच्...

भाजप प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांचा विशेष लेख>>>≥>

इमेज
  राखीचा धागा : बहिणीच्या मायेची आणि भावाच्या कर्तव्याची आठवण रक्षाबंधन हा केवळ बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नाही; तो रक्ताच्या नात्यातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्परांच्या रक्षणाची भावना दृढ करणारा संस्कृतीचा उत्सव आहे. हजारो वर्षांच्या भारतीय परंपरेतून आलेल्या या सणामागे केवळ एक धागा नसतो, तर त्या धाग्याला जोडलेल्या असतात असंख्य आठवणी, बालपण, माया आणि आयुष्यभराची निःस्वार्थ साथ. बहिणीच्या हाताने भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी म्हणजे भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना असते. त्याच वेळी भावानेही आपल्या बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहावे, संकटाच्या वेळी धावून जावे, ही त्या राखीची खरी भावना आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीचा सन्मान आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी ही केवळ कायद्याची बाब न मानता ती कुटुंबाच्या संस्कारांचा भाग मानली आहे. संकटसमयी बहिणीसाठी भाऊ धावून जाणे, तिच्या सुख-दुःखाची विचारपूस करणे, तिच्या संसारातील अडचणीच्या वेळी आधार देणे, हे भावाच्या कर्तव्याचेच एक रूप आहे. बहिणीला महागडी भेट नक...

कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न

इमेज
ना. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न बीड दि. २७ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे. युवा मोर्चाच्या या नव्या दमदार टीममध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या युवकांना प्राधान्य देऊन एक चांगला संदेश देण्यात आला आहे.     ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक फळी मजबूत करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय दिला आहे. नव्या कार्यकारिणीत समाजातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय आदी विविध जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. यात ७ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १५ सचिव, १० सदस्य आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. *प्रत्येकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू - ना. पंकजाताई* -------- संघटनेत असंख्य कार्यकर्ते असताना प्रत्येकांना...
इमेज
सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती? भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत, त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल. यंदा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण साजरे केले जाणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे, राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती? सकाळ, दुपार की संध्याकाळ? आणि राखी बांधण्याची शुभ वेळ चुकली तर काय करावे? कोणत्या वेळेत राखी बांधावी? सर्व माहिती जाणून घ्या.. सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्य...
इमेज
नेपाळमध्ये पूरस्थिती; बीड जिल्ह्यातील पर्यटकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन बीड, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कोणतेही पर्यटक नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे अडकले असतील किंवा त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर संबंधित पर्यटकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नेपाळमध्ये असलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधितांनी सोबत दिलेल्या ऑनलाईन लिंकवर आवश्यक माहिती भरावी, जेणेकरून प्रशासनाला संबंधित व्यक्तींची माहिती संकलित करून आवश्यक ती मदत व कार्यवाही करणे शक्य होईल. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा : टोल फ्री : १०७७ जिल्हा नियंत्रण कक्ष, बीड : ०२४४२-२९९२९९ नेपाळमधील पूरस्थिती लक्षा...
इमेज
प्रामाणिकपणाची ‘गौरव’ गाथा! : ‘सापडले ते आपले नाही’ प्रेरक दृढ भावना एटीएम मध्ये सापडली रक्कम; गौरव इंगळेंनी स्वतः पोलीसात जावून केली स्वाधीन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :         आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या घटना निश्चितच प्रेरणादायी ठरतात. परळी शहरातील गौरव  इंगळे यांनी याचा प्रत्यय देत एटीएममध्ये सापडलेली ₹३ हजारांची रक्कम स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन केली.प्रश्न रक्कम किती होती हा नाही तर सजग व प्रामाणिकपणा याचे हे उदाहरण ठरले आहे.         आयडीबीआय बॅकेच्या बाजुला असलेल्या एटीएममध्ये गौरव इंगळे यांना तीन हजार रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम आपली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती संभाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ती जमा केली. आजच्या काळात सापडलेली वस्तू किंवा रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र, ‘सापडले ते आपले नाही’ ही जाणीव मनात ठेवून गौरव इंगळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा समाजासाठी...