दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!
माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ : परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख यांचे 87 वर्षी आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. निधनाने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने देशमुख परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.