प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:खूषखबर : आजच्या अहवालात परळीत पाॅझिटिव्ह रिपोर्ट निल...

 खूषखबर : आजच्या अहवालात परळीत पाॅझिटिव्ह रिपोर्ट निल...



*काल परळीत एकही करोना +ve पेशंट सापडला नाही*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   दररोजच्या प्रमाणे आजचे ही covid-19 चे प्रशासकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये परळी तालुक्याचा अहवाल संपूर्ण स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे  की आजच्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह च्या आकडेवारीत परळी तालुका निल दिसून येत आहे. मात्र हीच आकडेवारी नियमित सुरू राहणे आवश्यक आहे. दरम्यान आज आलेले अहवाल हे  परवा दिनांक अकरा रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचे आहेत. दिनांक अकरा रोजी परळीत एकूण तीस स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल दिनांक 12 रोजी परळीतून एकूण 35 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल उद्या मिळणार आहेत. यामध्येही सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव यावेत म्हणजे परळी तालुका शुन्य कोरोना  लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करु शकतो असे म्हणता येईल.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या