प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:पाऊसाची शक्यता* खबरदारीसाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन




*बीड जिल्हयात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊसाची शक्यता*


खबरदारीसाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन


बीड, दि. १४ ::- जिल्हयात 13 ते 17 आॅक्टोबर 2020 या काळात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मूसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सुचनेनुसार हा बीड सह मराठवाडयातील जिल्ह्यात हा इशारा देण्यात आला आहे. 


*खबरदारीची उपाययोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घ्यावी.यासाठी पुढील गोष्टी करा:*


1. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा.

2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा

घराबाहेरील ओटयावर थांबू नका.

3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालु असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

4. तारांचे कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दुर रहा.

5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.                            


    *या गोष्टी करु नका:*


1. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. 

शॉवरखाली अंघोळ करु नका.

घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका.


2. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालु असतांना लोखंडी धातूच्या सहायाने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.


3. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.


4. धातुच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.


5. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे,

असे संतोष राऊत,निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या