प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला*

 *बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला*




परळी वैजनाथ(प्रतिनिधी) - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांनी गृह 18 वर्षांखालील विलगिकरणात असलेल्या रुग्णांना कोविड विषयक सल्ला व टेली उपचार मोफत देणार आहेत.नुकताच नवजीवन हॉस्पिटल चा 17 वा वर्धापन दिन संपन्न झाला त्याचे अवचित्त साधत या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.


यासाठी 9822484202 या क्र. संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. या लहानमुलांमध्ये लक्षणे दिसून येत नसले तरी संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांची संख्या ही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत 18 वर्षा खालील कोविड पाँझिटीव्ह गृह विलगिकरणात असलेल्या पेशंटना मोफत उपचार व्हाँटसापवर सल्ला सुरू करण्यात आला आहे. या सेवेबद्दल व सध्याच्या भयानक संकटात हा पुढाकार घेतल्याबद्दल कोविड रुग्णांच्या नातेवाईक व नागरिकांनी डॉ गुरुप्रसाद देशपांडे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या