गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS-बीडमध्ये गोळीबार..... जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या

  बीडमध्ये गोळीबार.....

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*



 ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

   बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या मुद्रांक व नोंदणी कार्यालयात शुक्रवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता गोळीबार झाला. यात दोघे जखमी झाले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Click: *छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम*

सतीश बबन क्षीरसागर (वय ३०, रा. लक्ष्मणनगर ,बीड) व फारूक सिद्दीकी  (वय २८ रा. जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते शुक्रवारी सकाळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Click:*आज रामदास नवमी:परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता*

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या