इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-औरंगाबादेत राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा

औरंगाबादेत राज्यस्तरीय सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा



वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*




Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

औरंगाबाद....

सर्वशाखीय ब्राह्मण वधू - वर परिचय मेळाव्याचे रविवार, २७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

Click: *छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम*

नाते मनाचे वधू-वर सूचक केंद्रातर्फे उच्चशिक्षित व अल्पशिक्षित शिक्षण, प्रथमवर, प्रथमवधु, घटस्फोटित, विधवा, विधुर, सापत्य, विनापत्य, जेष्ठ पुनर्विवाह तसेच नोकरी व व्यवसाय असलेल्या ब्राह्मण वधु-वरांसाठी, रविवार्य सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० पर्यंत कुलस्वामिनी मंगल कार्यालय, सिडको एन-६, औरंगाबाद येथे हा  मेळावा होणार आहे, अशी माहिती शंतनू चौधरी यांनी दिली.

Click:*आज रामदास नवमी:परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता*

या मेळाव्यात, परिचय देताना वधू वर  एल ई डी वॉल स्क्रिनवर लाईव्ह दिसणार आहेत , मेळाव्यात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या बी.ए. बी.कॉम व तत्सम अथवा याहून कमी शिक्षित मुलींना नोंदणी मोफत, जेवण कुपन तसेच आकर्षक गिफ्ट मिळेल. पुस्तिका मेळावा झाल्यावर ८ दिवसानंतर मिळेल. ७० जणांनी पूर्वनोंदणी केली आहे. मेळाव्यातील वधू-वरांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे त्यांचा परिचय शेकडो लोकांपर्यंत जातो. तसेच एकाच ठिकाणी अनेक स्थळे प्रत्यक्ष पाहण्यास मिळतात व थेट भेट घडवून दिल्या जाते. मेळाव्यात सहभागी  होण्यासाठी मो. क्र.  9423731158 (९४२३७३११५८) वर संपर्क करावा, असे आवाहनही शंतनु चौधरी यांनी केले आहे.

Click:-*बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण*

Click:-*बीडमध्ये गोळीबार.....* _जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या_

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!