MB NEWS- उद्याच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेवर आशा व गटप्रवर्तकांचा बहिष्कार

  _राज्य व केंद्र सरकारचे मानधन आशा व गटप्रवर्तक यांना मिळाले नाही !_

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*



*उद्याच्या  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेवर आशा व गटप्रवर्तकांचा बहिष्कार*  

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      राज्य व केंद्र सरकारचे मानधन आशा व गटप्रवर्तक यांना मिळाले नाही त्यामुळे उद्या दि.२७ फेब्रुवारी च्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेवर आशा व गटप्रवर्तकांचा  बहिष्कार राहणार आहे अशी माहिती बीड जिल्हा गटप्रवर्तक  व आशा वर्कर्स युनियन च्या वतीने देण्यात आली आहे.

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

            महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सी.आय.दु.यु.) घेतलेल्या निर्णयानुसार वेळोवेळी आंदोलन करून व निवेदन देवुन सुध्दा राज्य शासनाने मंजुर केलेला निधी देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात सुध्दा आपल्या जीवाची बाजी लावुन नागरिकांचे प्राण वाचविणे व विविध सर्व माहिती गोळा करून, माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आशा वर्कस करत आहे व त्यांचे रिपोर्टंग गटप्रवर्तक करीत आहेत. केंद्र सरकारने सुध्दा सलग ३ महिने हे मानधन दिलेले नाही. पोलिओ लसीकरण मोहिम राबवत असताना अल्प मोबदला देण्यात येतो तो किमान ३०० रूपये प्रति दिन देण्यात यावा.

Click:*आज रामदास नवमी:परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता*

या प्रमुख मागणीसह ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी चे मानधन देण्यात यावे.हर घर दस्तक व कवच कुंडल या सर्व्हेसाठी आशा व गटप्रवर्तक यांना मोबदला देण्यात यावा. कोवीड-१९ च्या लसीकरणाचा मोबदला देण्यात यावा.कुष्ठरोग मानधन देण्यात यावे.आशा व गटप्रवर्तक यांना २०२० पासुन स्टेशनरी किंवा स्टेशनरी भत्ता देण्यात आलेला नाही तो मिळावा. आरोग्य वर्धीनिचा मोबदला देण्यात यावा. अशा युनियनच्या मागण्या आहेत.केंद्र व राज्य सरकार यांनी सर्व कामे करून सुध्दा मोबदला दिलेला नाही. परंतु दबाव आणुन त्यांच्या कडुन कामे करून घेत आहेत.

Click:-*बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण*

Click:-*बीडमध्ये गोळीबार.....* _जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या_

               राज्य शासनातर्फे जुलै २०२० पासुन आशा यांना २०००/- रूपये व गटप्रवर्तक यांना ३०००/- रूपये मार्च २०२१ पासुन ही रक्कम आशा व गटप्रवर्तक यांना मिळालेली नाही. तसेच जुन २०२१ पासुन आशांना १५००/- रूपये व गटप्रवर्तकांना १७००/- रूपये लागु करण्यात आले आहे.परंतु ते सुध्दा आजअखेर आशा व गटप्रवर्तकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेवर आशा व गटप्रवर्तकांचा  बहिष्कार राहणार आहे असा इशारा बीड जिल्हा गटप्रवर्तक  व आशा वर्कर्स युनियनचे मार्गदर्शक  प्रा. बी. जी. खाडे,तालुकाध्यक्ष वर्षा कोकाटे, उपाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा रेवले, हेमा काळे, छाया रणदिवे, अनिता गिराम, सत्यभामा सुरवसे, मीरा स्वामी, अर्चना चाटे, सुनिता होळबे, उमा वाघमारे, मनिषा दळवी आदींनी दिला आहे.

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !