इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त*

 *साहेबराव थोरवे दादांच्या निधनाने जिल्ह्याच्या समाजकारणातील ऊर्जास्रोत निवर्तला - धनंजय मुंडे*




🔸

संग्रहित छायाचित्र

🔸






*ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त*


मुंबई (दि. 04) - : आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात आगळा वेगळा नावलौकिक स्थापित केलेले ज्येष्ठ नेते साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या समाजकारणातील एक ऊर्जास्रोत निवर्तला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 

🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील साहेबराव थोरवे दादा यांचे आज पहाटे वयाच्या 120 व्या वर्षी निधन झाले. कडा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक त्याचबरोबर आष्टी पंचायत समितीचे अनेक वर्षे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. 


दोन वर्षांपूर्वी श्री. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा साहेबराव थोरवे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांना भेटायला थेट मुंबईला गेले होते. 118 वर्षांचे साहेबराव दादा कोणत्याही आधाराशिवाय या वयातही चालू शकतात, याचे अनेकांना कुतूहल वाटले होते; त्या आठवणी जाग्या करत, त्यांचा हा उत्साह आम्हाला सतत प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

दरम्यान ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा ज्येष्ठ नेते स्व. साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

               •••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









               ••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!