इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-राशिभविष्य (दि. ९ फेब्रुवारी २०२२)

  राशिभविष्य (दि. ९ फेब्रुवारी २०२२)



मेष : वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.


वृषभ : उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.


मिथुन : आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा.


कर्क : प्रेम प्रकरणात यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल.


सिंह : मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.


कन्या : सरकारी कामांत अडचणी येतील. छाती संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.


तूळ : श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.


वृश्चिक : प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. प्रवासाचे योग.


धनु : सत्संगात दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग.


मकर : खरेदीचा मोह नुकसानदायक ठरेल. देणीदारांकडून त्रास होईल. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.


कुंभ : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रवासात सावधानता आवश्यक आहे.


मीन : कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीबरोबर संवाद होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. संयम आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या