परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-काळाचा घाला: अंबाजोगाईच्या व्यवसायिकाच्या गाडीला अपघात; एक ठार दोन जखमी

 काळाचा घाला: अंबाजोगाईच्या व्यवसायिकाच्या गाडीला अपघात; एक ठार दोन जखमी


अंबाजोगाई - येथील व्यापारी जितेंद्र झंवर (वय ४८) हे पत्नी आणि मुलीसह औरंगाबादहून
अंबाजोगाईकडे येत असताना बीड जवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जितेंद्र झंवर यांची पत्नी ज्योती (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी रजत (वय १९) आणि स्वतः जितेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला.

       पत्नी आणि मुलगी रजत यांच्यासह स्वतःच्या कारने (एमएच ४४ एस २९९०) गुरुवारी सकाळी औरंगाबादला गेले होते. तिथे सर्व काम आटोपून ते साडेअकराच्या सुमारास अंबाजोगाईला परत निघाले. प्रवास आणि दिवसभराच्या कामामुळे झोप येऊ लागल्याने जितेंद्र यांनी बीडच्या पुढे घाट ओलांडल्यावर एका हॉटेलसमोर थांबून थोडावेळ आराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घाट सुरु होण्यापूर्वीच कोळवाडी येथे दिड वाजताच्या सुमारास त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरील एका ट्रकला कार मागच्या बाजूने धडकली. या भीषण अपघातात एअर बॅग उघडल्याने जितेंद्र हे सखरूप
भीषण अपघातात एअर बॅग उघडल्याने जितेंद्र हे सुखरूप बचावले, मात्र शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, मागील सीटवर बसलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!