MB NEWS-स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस

 स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस

--------------------



परळी वै. (प्रतिनिधी):-

परळी शहरातील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेतील कर्मचारी व पिग्मी एजंटाना दिवाळी बोनस रोखीने दिला आहे. यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी दिली.

        परळी शहरातील छोटे व किरकोळ व्यापार्‍यांचा आर्थीक कणा म्हणुन उदयास येत असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्मचारी व पिग्मी एजंटांना नगदी स्वरूपात दिवाळीनिमित्त बोनस दिला आहे. पतसंस्थेनी कोरोना काळात पिग्मी एजंटांना दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य दिले होते. पतसंस्थेनी कर्जदार ग्राहकांचा अपघाती विमाही सुरू केला आहे. पतसंस्था शहरातील छोटया व्यापार्‍यांना सहज व तात्काळ कर्ज देण्यात तत्पर आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासीक बैठकीत पिग्मी एजंटांना प्रत्येकी दोन हजार तर कर्मचार्‍यांना तीन हजार रूपये याप्रमाणे दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या बैठकीस सचिव लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्षा सुनिता वाघमोडे, संचालक राजाभाउ आढाव, राजेश्वर निला, सचिन मुंदडा,  संजय गोरे, सुमन चव्हाण, सुवर्णा जंगले, विद्या मुंडलीक व्यवस्थापक प्रकाश चव्हाण यांची उपस्थीती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार