इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:उपनयन संस्कार सोहळ्यात झळकला 'छोटा कार्यकर्ता' ; हिरिरीने पंगतीत वाढ करणारा यश सर्वज्ञ

 उपनयन संस्कार सोहळ्यात झळकला 'छोटा कार्यकर्ता' ; हिरिरीने पंगतीत वाढ करणारा यश सर्वज्ञ




परळी वैजनाथ प्रतिनिधी....
         सार्वजनिक व सामाजिक कार्याची रुजवन बालवयातच होते याचे मूर्तिमंत उदाहरण आज परळी येथे आयोजित एका सोहळ्यात बघायला मिळाले. परळी येथे आयोजित उपनयन संस्कार सोहळ्यात वयस्कर कार्यकर्त्यांबरोबरच एका चुकल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात हा 'छोटा कार्यकर्ता' हिरीहिरीने पंगतीत वाढ करताना दिसून येत होता. उपस्थितांतून त्याचे विशेष कौतुक झाले.



       परळी येथे समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप येथे उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात भोजन व्यवस्थेमध्ये मोठी लगबग सुरू असताना जेवणाच्या पंगती बसल्या. या पंक्तीत वयस्कर मोठ्या कार्यकर्त्यांनी पंगती वाढतांना या व्यवस्थेत परळी येथीलच मनोजराव जब्दे यांचा नातू यश सर्वज्ञ हा चिमुकला कार्यकर्ता झळकू लागला. पंगतीवर पंगती उठत होत्या परंतु हा छोटा कार्यकर्ता यश मात्र पंक्तीमध्ये वेगवेगळे पदार्थ वाढण्यात हिरिरीने भाग घेताना दिसत होता. अतिशय छोट्या वयात त्याचा उत्साह व काम करण्याची तडफ पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या