इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

काही महिन्यांपूर्वीच आले होते वैद्यनाथ दर्शनाला परळीत......!

योगगुरु पद्मश्री बाबा शिवानंद स्वामी यांचे निधन, वयाच्या १२८ व्या वर्षी अखेरचा श्वास

वाराणसीमध्ये 128 वर्षांचे योगगुरू बाबा शिवानंद यांचे निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बाबा शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.योग साधक शिवानंद बाबा यांचे निधन झाले आहे.

● सविस्तर वाचा: ● कोण आहेत स्वामी शिवानंद?

 बाबा शिवानंद वाराणसीच्या भेलूपुरमधील दुर्गाकुंड भागात कबीर नगरमध्ये राहत होते. तिथेच त्यांचा आश्रम आहे. वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाराणसीमध्ये १२८ व्या वर्षी योग गुरु बाबा शिवानंद यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेत समर्पित केले. त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगले आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शिवानंद बाबा यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. २१ मार्च २०२२ रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, योग साधक आणि काशी निवासी शिवानंद बाबाजी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. योग आणि साधनेला समर्पित त्यांचे जीवन देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.योगाच्या माध्यमातून समाजसेवा केल्याबद्दल त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले. शिवानंद बाबा यांचे शिवलोक प्रयाण हे काशी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या करोडो लोकांसाठी मोठी हानी आहे. मी या दुःखाच्या क्षणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बाबा शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी पश्चिम बंगालमधील श्रीहट्टी येथे झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती.शिवानंद बाबा यांचे आई वडील भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. शिवानंद बाबा हे चार वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना नवद्वीपचे बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्या हवाली केले. त्यानंतर त्यांच्या आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू उपासमारीने झाला. यावर्षीच्या कुंभमेळ्यात पवित्रस्नान करण्यासाठी ते प्रयागराजला देखील आले होते. त्यांची सकाळ पहाटे ३ ते ४ ला होत असते. स्नान करून ते ध्यान आणि योगा करत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या