98 टक्के गुण घेऊन मंथन लक्ष्मीनारायण मंत्री याचे दहावीत घवघवीत यश

परळी  (प्रतिनिधी)_ इयत्ता दहावीच्या परीक्षेत चि. मंथन लक्ष्मीनारायण  मंत्री याने 98% गुण घेऊन न्यू हायस्कूल शाळेतून द्वितीय येण्याचा मान पटकावला.

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलचा  विद्यार्थी याने 98 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

चि. मंथनच्या  यशाबद्दल सर्वस्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.  पालकांचे  व  शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्याने सांगितले. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी  शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!