इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

Congratulations Samiksha !!!!!

समिक्षा वाघमारेचे शालांत परीक्षेत 92 टक्के गुणांसह दैदिप्यमान यश

परळी / प्रतिनिधी 

       परळीच्या भिमवाडी येथील रहिवासी व विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा धम्मपाल वाघमारे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 92. 80 टक्के गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळवले आहे.

     कु.समिक्षा धम्मपाल वाघमारे ही वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा.दासू वाघमारे यांची पुतणी आहे. शहरातील विद्यावर्धिनी विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे.नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तिने 92.80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी, वाघमारे कुटुंबीयांनी व आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....