नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

सेवानिवृत्तीनंतरही कार्यतत्परता.....

 डॉ. हरिभाऊ बंडेराव पांडे यांचा सेवाभावी प्रवास; ‘महापशुधन एक्सपो 2026’मध्ये मोलाच्या योगदानाबद्दल गौरव




परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन पदावर कार्यरत असलेले डॉ. हरिभाऊ बंडेराव पांडे यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाल विनाडाग पूर्ण करत सेवानिवृत्ती स्वीकारली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी पशुसंवर्धन विभागात विविध जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने सेवा बजावली.

डॉ. पांडे यांनी जालना, कोल्हापूर, परभणी तसेच बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा दिली. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि दुर्गम क्षेत्रातील जनतेपर्यंत आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा पोहोचविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. लसीकरण मोहिमा, पशुरोग प्रतिबंधक शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि पशुधन विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपली कार्यतत्परता कायम ठेवत महापशुधन एक्सपो 2026 या अखिल भारतीय पशुप्रदर्शनाच्या आयोजनात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदविला. मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार त्यांनी नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.

त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (मंत्री, पशुसंवर्धन व पर्यावरण) यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार देवरे तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या