मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन......
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आष्टीत डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे १९ फेब्रुवारीला उद्घाटन
बीड : प्रतिनिधी..
‘डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन’ (वर्ष – ३ रे) चे उद्घाटन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित हे प्रदर्शन मराठवाड्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यावेळी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे , पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बाळासाहेब आजबे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, संशोधक व पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, पीकपद्धतीतील बदल, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन तसेच कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन या प्रदर्शनात दिले जाणार आहे. अत्याधुनिक कृषी अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि जलसंधारण तंत्र यांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
हे प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संचलित श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर, नगर–जामखेड रोड, आष्टी येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.राज्यभरातील विविध शासकीय विभाग, कृषी कंपन्या, स्वयंसेवी संस्था व प्रगत शेतकरी यांचे स्टॉल या प्रदर्शनात असणार असून शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संधींचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यातील कृषी क्षेत्राला चालना देणारे हे प्रदर्शन आष्टी तालुका व बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा