ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

तहसीलदार वर कारवाई ... तहसील परिसरात फटाके फोडून केला जल्लोष

 सतत वादग्रस्त ठरलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच प्रकरणी जाळ्यात !



 परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

       कायमच वादग्रस्त राहिलेल्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर आज लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने कारवाई केली असून लाच प्रकरणांमध्ये व्यंकटेश मुंडे जाळ्यात अडकले आहेत. 

     परळी वैजनाथ येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराला ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात वीस हजार रुपयांमध्ये तडजोडीने हे प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. या अनुषंगाने आज एका पथकाने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात दाखल होत या लाच प्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर कारवाई केली आहे. तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्षात ही लाच स्वीकारली नसली तरी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक सर्व पुरावे संकलित केले,सर्व शहानिशा केल्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे दोषी असल्याचे आढळले. त्यानुसार त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत अधिकृत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

अनेक वेळा वादग्रस्त ठरले व्यंकटेश मुंडे

दरम्यान, व्यंकटेश मुंडे यांच्या कारकीर्दीत अनेक वेळा त्यांच्या कार्यपद्धतीवरुन ते  वादग्रस्त ठरलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये खा. बजरंग सोनवणे यांनी त्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निवडणूक कामकाजापातून दूर करा अशी मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वारंवार त्यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रकरणात भाजपनेते किरीट सोमय्या यांनीही परळीतील तहसील मधून अनेक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आल्याचे प्रकरण हाती घेतले होते. या प्रकरणातही व्यंकटेश मुंडे यांच्याकडे संशयाची सुई होती. तसेच अनेक वेळा काम करताना तहसीलदार हे वस्तुनिष्ठ काम करत नसल्याचे नागरिकांमधूनही वारंवार आरोप त्यांच्यावर होत होते. एकंदरीतच सतत वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर अखेर लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

तहसीलदार वर कारवाई ... नागरिकांनी तहसील परिसरात फटाके फोडून केला जल्लोष

     दरम्यान, सतत वादग्रस्त ठरलेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती कळाल्यानंतर काही नागरिक तहसील परिसरात जमा झाले. यातील काही नागरिकांनी तर तहसील परिसरात येताना सोबत फटाके ही आणले. 'अतिशय योग्य झाले', 'ही कारवाई व्हायलाच पाहिजे होती' अशा प्रतिक्रिया व्यक्त करत याचा एक प्रकारे आनंद व्यक्त केला. या नागरिकांनी तहसील परिसरातच फटाके फोडून जल्लोष केल्याचेही बघायला मिळाले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या