सौर ऊर्जा उपलब्ध करण्या बाबत ग्राहक पंचायतच्या  निवेदनाची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल :- अनिल बोर्डे



गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मि ळण्यासाठी  बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी दिलेल्या निवेदनाची मा. श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या सचिवालयाने तात्काळ  दखल घेऊन सदरील प्रकरण संबंधित विभागाकडे  निवेदन तात्काळ पुढील योग्य त्या कार्यवाही स्तव सादर करण्यात आले आहे . त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुसंख्य रक्कम भरणाऱ्या शेतकरी ग्राहकाना सौर ऊर्जा मिळण्या बाबत रकमेचा भरणा करण्यात आला आहे. त्या सर्व शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जाचा लाभ  मिळणार आहे.  त्यामुळे बीड जिल्ह्यातील रक्कम भरणाऱ्या शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जाचा तात्काळ लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे तसा ई-मेल(पत्र) बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याकडे प्राप्त झाला आहे . यापूर्वी देखील ग्राहक पंचायतच्या वारंवार पत्रव्यवहार केल्यामुळे बीड जिल्हा सौर ऊर्जा प्रथम क्रमांकात आला होता. अशी माहिती बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार