फोटोग्राफर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये छत्रपती संभाजीनगर अजिंक्य 




छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफर मैत्रीपूर्ण सामन्यातून दहा संघानी सहभाग नोंदवला होता बीड ,लातूर, अहमदपूर ,अंबाजोगाई, छ. संभाजीनगर व पुणे जिल्ह्यातून शिरूर, चाकण- आळंदी व खेड तसेच परळी येथील असोशियनचा संघ याप्रमाणे  दहा संघानी यात सहभागी होऊन या सामन्याचा आनंद घेतला. 

या सामन्यासाठी जेष्ठ फोटोग्राफर यशवंत चव्हाण ,हरिप्रसाद मोदाणी ,विठ्ठलराव झिलमेवाड, सुनील फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडू परिचय व नोणेफेक करून प्रत्येक सामन्याची सुरुवात करून देण्यात आली.बाद पद्धतीने व लकि  ड्रा व्दारे ही स्पर्धा घेण्यात आली.यात विजेते ठरले ते छ.संभाजीनगर,उपविजेते परळी फोटोग्राफर असो .क्रिकेट टिम ,तृतीय क्रमांक चाकण -आळंदी तर चतुर्थ स्थान शिरूरला मिळाले.उत्कृष्ट फलंदाज कुणाल जोशी, उत्कृष्ट गोलंदाजी राम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण  तुषार पोतले यांना देण्यात आले.परळीतील आकाश गित्ते यांनी अर्धशतक व गोलंदाजी साठी त्यांना मिळालेले  उत्कृष्ठ फलंदाज इतरांना देऊ केले.या साठी त्याचे खेळाडूवृत्ती दाखवून दिली.स्वताला मिळणारे पारितोषक परगावाहून आलेला मित्राला देवू केले, अतिशय खेळाडू वृत्ती दाखवली.

आयुष्यात अतिशय व्यस्त व कामाच्या ठिकाणी शारीरिक व मानसिक व्यापाला सामोरे जातांना येणारा थकवा व आजारपणाला दुर ठेवण्यासाठी विरंगुळा व आनंद निर्माण व्हावा,या करिता या खेळा सारखे  सांघिक खेळ सातत्याने घेऊन  ,ओळख चर्चा, सहभाग, स्नेहसंबंध निर्माण हा हेतू साध्य करण्यासाठी परळीतील फोटोग्राफर असोचे खेळाडू संतोष चव्हाण, आकाश गित्ते, झिलमेवाड बाळू, नागेश स्वामी, सिध्देश्वर वाघमारे,शिवा, महेश चव्हाण संयोजक या भुमेकेतून यशस्वी झाले. मोहन तिडके युट्यूब लाईव्ह, राजाराम तोरडमल  व्हिडिओ कॅमेरा,व ड्रोन पायलट बाजिराव राठोड, यांनी सहकार्य केले.

चाकण सरपंच श्रीधर तापकिर, यशवंत चव्हाण, हरिप्रसाद मोदाणी, विठ्ठलराव झिलमेवाड,राम भाले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यासाठी सुत्र संचलन  सुनील फुलारी यांनी केले.समारोप प्रसंगी लातूरकर सतिश बरडे यांनी गुल्कोज बिस्कीट पुडे वाटप केले व स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.परळीतील बहुसंख्य छायाचित्रकार यांनी सहकार्य व सहभाग नोंदवला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार