प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

 प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना –  युवकांसाठी सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा – प्रशासनाचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, दि. 02 (विमाका) :- केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील युवकांसाठी करिअर घडविण्याची एक महत्त्वपूर्ण संधी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

       या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाते. इंटर्नशिप दरम्यान दरमहा रु. ९,००० आर्थिक सहाय्य तसेच सुरुवातीला रु. ६,००० एकरकमी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, नवीन कौशल्ये विकसित करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार करण्याची संधी तसेच आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास साधण्यास मोठी मदत होणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून उमेदवार पूर्णवेळ नोकरीत नसणे आवश्यक आहे.सध्या या योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in⁠ या संकेतस्थळावर जाऊन त्वरित अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. छत्रपती संभाजीनगर विभागातील जास्तीत-जास्त युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन उपआयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार