नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...
"तु मेरे साथ शादी कर,वरना भगाके ले जाऊंगा" ;दबाव टाकत धमकी
परळीत तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
परळी वैजनाथ,प्रतिनिधी....
"तु मेरे साथ शादी कर,वरना भगाके ले जाऊंगा" असा दबाव टाकत धमकी व विनयभंग केल्पयाप्ररकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परळीशहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही व्यवसायाने घरकाम करत असून २२ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी अम्रु शेख (रा. आपना चौक, रौफ कॉलनी, परळी) याने फिर्यादी तरुणीला अडवून “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला पळवून नेईन” अशी धमकी दिली. तसेच तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पो.ह. जाधव हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा